भाजपच्या कमळ चिन्हावरीलच खासदार निवडून येईल !

नितेश राणेंना विश्वास
Edited by: विनायक गावस
Published on: October 10, 2023 11:30 AM
views 332  views

सावंतवाडी : निलेश राणे यांना साडेतीन लाख मते मिळाली होती. ती मिळुन भारतीय जनता पार्टीची रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा लाख मते हक्काची आहेत. त्यामुळे भाजपच्या कमळ या चिन्हावरीलच खासदार निवडून येईल असा विश्वास भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे महाविकास संकल्प २०२४ अभियानांतर्गत आयोजित समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, उमेदवार कोण असेल हे वरिष्ठ ठरवतील. पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणणे आणि महायुतीचाच खासदार विजयी करण्यासाठी भाजपचे वॉरियर्स तयार आहेत. कमळ चिन्हाचाच खासदार असावा अशी भावना कार्यकर्त्यांची असून ही भावना वरिष्ठापर्यंत पोहोचवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उबाठाचे खासदार विनायक राऊत यांना यापुढे खासदार म्हणून ठेवणार नाही. भविष्यातील खासदार महायुतीचाच दिसेल शत प्रतिशत भाजप असेल असा विश्वास व्यक्त केला. ज्याप्रमाणे सैनिक आपला देश जिंकला पाहिजे यासाठी काम करतो तशाच प्रकारे भारतीय जनता पार्टी आगामी काळातील निवडणुकांमध्ये विजयी होण्यासाठी सुपरवारीर्यस ची नेमणूक करत आहे. हे वॉरियर्स म्हणजे महेश सारंग आणि संजू परब पॅटर्न असून भाजपची ताकद कमी न होता पक्ष जिंकला पाहिजे या भूमिकेतून रणांगणात उतरले असल्याचे त्यांनी सांगितले. 

सावंतवाडी येथील शहाबुद्दीन हॉल येथे बोलताना त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष संजू परब आणि जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांच्या कामाचे कौतुक केले. ते चांगले उपक्रम राबवत असल्याचे म्हणाले, तर किरण सामंत यांच्या स्टेटसबाबत विचारले असता सामंत यांचा राग पवारांवर होता. त्यांचा भाजपवर राग नसल्याचे ते म्हणाले. त्यांनी भारतीय जनता पार्टीत यावे याचा त्यांनी पुनरुचार केला. सुपर वाॅरिअर्स आणि मेरी मिट्टी मेरा देश संकल्पना जिल्हा भरात राबविण्यात येणार आहे तसेच महेश सारंग पॅटर्न जिल्ह्यात भाजपा राबविल असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग,  उपाध्यक्ष अतुल काळसेकर, एकनाथ नाडकर्णी, राजन म्हापसेकर, संदीप मेस्त्री, श्वेता कोरगावकर, चेतन चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, महेश धुरी, प्रथमेश तेली, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.