वेंगुर्ला तालुक्याचा डोंगरी क्षेत्र उपगट मध्ये समावेश | शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना यश

Edited by: दिपेश परब
Published on: March 14, 2024 08:17 AM
views 842  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्याचा डोंगरी क्षेत्र उपगट मध्ये समावेश करण्यात आला असून यात तालुक्यातील ४६ महसूल गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून या डोंगरी क्षेत्र योजनेत वेंगुर्ले तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे.

डोंगरी उपगट वेंगुर्ला तालुक्यात परुळे, म्हारतळे, कर्ली, पेंडूर, गावतळे, चिपी, केळुस, सखैलेखोल, तळेकरवाडी, मातोंड, होडावडा, पिंपळगाव, गवाण, म्हापण, रावदस, सातवायंगणी, सोन्सुरे, वायंगणी, टांक, वडखोल, खालचीवाडी, न्हईचीआड, जोसोली, खवणे, वेंगुर्ला, वरचेमाड, कनयाळ, मेढा, खानोली, पाल, अणसूर, शेळपी, सातये, वेतोरे, मायना, श्रीरामवाडी, आसोली, कोचरे, कालवी, मोचेमाड, मुठ, तुळस, भोगवे, पडतल, दाभोली, वरचीवाडी, मठ या महसूल गावांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासन नियोजन विभागाकडून १३ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे.