मोटरसायकल चोरीला

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 01, 2024 20:04 PM
views 130  views

देवगड : देवगड दाभोळे तिठा येथे मुंबईला जाताना दाभोळे तिठा पिकअपशेड समोर लॉक करून ठेवलेली मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 26 नोव्हेंबर रोजी घडली.

एका खासगी ट्रॅव्हल्स वर चालक असलेल्या टेंबवली कोयंडेवाडी येथील उमेश सत्यवान कोयंडे यांनी मुंबईला जाताना दाभोळे तिठा पिकअपशेड समोर लॉक करून ठेवलेली मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 26 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे..या चोरीप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,टेंबवली कोयंडेवाडी येथील उमेश सत्यवान कोयंडे हे दिक्षीत या खाजगी ट्रॅव्हल्सवर चालक आहेत. ते 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वा.दिक्षीता ट्रॅव्हल्स ही गाडी मुंबईला घेवून जाण्यासाठी निघाले यावेळी गावाहून स्वत:चा मालकीची हिरोहोंडी कंपनीची सीबीझेड एक्सप्रेम नं.एम्.एच्.07-व्ही 2188 ही मोटरसायकल त्यांनी दाभोळे पिकअपशेड समोर बंद हॉटेलच्या समोर लॉक करून उभी करून ठेवली व ते ट्रॅव्हल्स  घेवून मुंबईला गेले.28 रोजी ते मुंबईहून सकाळी 7.30 वा.सुमारास आल्यानंतर त्यांनी ज्या जागी मोटरसायकल ठेवली होती. ती चोरून नेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या चोरीबाबत देवगड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास पो.हे.कॉ.राजन जाधव करीत आहेत.