
आंबोली : आंबोली आजरा फाटा या ठिकाणी मोटरसायकल घसरून आजरा येथील आदित्य कोरवी वय 19 या युवकाचा दगडावर डोके आपटल्यामुळे जागीच मृत्यू झाला. आदित्य कोरवी व त्याचे दोन मित्र ओंकार कारेकर व वेदांत कोंडुस्कर हे आंबोली साठी एकाच मोटरसायकल वरून पर्यटनासाठी आले होते. त्यांच्यासोबत आणखी एक मोटर सायकल होती हे घटना सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.
आंबोलीतील पर्यटन ऑटोपून हे युवक आजाराच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला आदित्य हा आजरा महाविद्यालय येथे बीए प्रथम वर्षामध्ये शिकत होता. तसेच तो एका ठिकाणी काम करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करायचा आदित्य याच्या पक्षात आई व छोटी बहीण असा परिवार आहे. अपघाताची घटना कळताच आंबोली पोलीस कॉन्स्टेबल दीपक शिंदे व मनीष शिंदे हे घटनास्थळी जाऊन मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणला अधिक तपास आंबोली पोलीस करत आहेत.