
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स इंग्लिश स्कुल सावंतवाडीने यंदाही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत १०० टक्के यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. कु. सावंत सोहम सचिन याने ९४ टक्के प्राप्त करुन प्रथम तर कु. नंदेश्वर हर्षल राजेश याने ९३.४० टक्के प्राप्त करुन व्दितीय तर कु. कांबळी सिद्धी संदीप हिने ९०.२० टक्के पटकावुन तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
त्याचप्रमाणे कु. सैनी प्रगती राजेंद्र 89.00%, कु. रेगर शुभम सिताराम 88.80% यांनी देखील उज्ज्वल यश संपादीत केले.सर्व यशस्वी विदयार्थ्याचे सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी सावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखम सावंत भोंसले, युवराज्ञी श्रध्दाराजे सावंत भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई, मंडळाचे सहायक संचालक श्री. अॅड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगावकर. तसेच प्रशालेचे, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.