
देवगड : मातेने तिच्या दोन मुलांसह तिर्लोट आंबेरी येथील पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना देवगड येथे घडली आहे.
देवगड तालुक्यातील तिर्लोट आंबेरी येथील श्रीशा सुरज भाबल वय २४ रा .तिर्लोट आंबेरी हिने १६ एप्रिल बुधवारी सायंकाळी सहा पूर्वी तिर्लोट पुलावरून दोन मुलांना घेऊन नदीपात्रात झोकून देऊन आत्महत्या केली सदरची घटना बुधवारी १६ एप्रिल रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार श्रीशा सुरज भाबल ही आपल्या मुलांसह १५ एप्रिल रोजी घरातून निघून गेली होती तिर्लोट आंबेरी येथे आईने दोन मुलासह नदीत उडी घेऊन आत्महत्या केली असल्याचे आहे. यामध्ये श्रीशा सुरज भाबल वय २४ व मुलगा श्रेयस सुरज भाबल वय वर्ष ०५ या दोघांचा मृतदेह १६ एप्रिल रोजी आंबेरी जेटी सायंकाळी आढळून आला. दुर्वेश सुरज भाबल वय वर्ष ०४ अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.पी सोनलवाडकर यांनी दिली.
या शोध मोहिमेमध्ये तिर्लोट आंबेरी गावातील ग्रामस्थांसह विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे एस.बी पडेलकर, पी.पी जाधव, व्ही.एस पडवळ, पी.एस गावडे, पी.डी कांबळे, बी.एल कांदे आदी पोलीस कर्मचारी यांनी देवगड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल झाले आहे पुढील तपासाची प्रक्रिया सुरू असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले. आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही.