
सिंधुदुर्गनगरी : आई भराडीने आम्हा राणे कुटुंबीयांना खुप काही दिले आहे. त्यामुळे आम्ही आईचे दर्शन घेऊन तिचे आभार मानायला आलो आहोत. या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक हा आईचा भक्त आहे. या ठिकाणी कुणीही लहान कुणीही मोठ नाही. मात्र, यावेळी दर्शन घेताना भाविकांना त्रास होत आहे. मात्र, हा त्रास या पुढे होणार नाही याची ग्वाही पालकमंत्री म्हणून देतो असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिलं.