डास निर्मुलन मोहिम प्रभावीपणे सुरू !

नागरिकांच्या रोषानंतर न.प. प्रशासनाला जाग
Edited by: विनायक गांवस
Published on: June 22, 2024 15:00 PM
views 102  views

सावंतवाडी : वाढते डेंग्यू, मलेरियाचे रूग्ण व सावंतवाडीकरांना डासांचा होणारा रोजचा मनस्ताप यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरूद्ध नाराजी व्यक्त केली होती. नागरिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर नगरपरिषद प्रशासनाकडून डास निर्मुलन मोहिम प्रभावीपणे अंमलात आणण्यात आली आहे. शहरात लिक्वीड टाकून डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी प्रशासन अखेर अलर्ट झालं आहे. 


सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी यांनी दोन दिवसांत संपूर्ण शहरात डास निर्मुलन मोहिम हाती न घेतल्यास १ हजार मच्छर अगरबत्त्या मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात लावणार असल्याचा इशारा दिला होता. शहरातील मनसे पदाधिकारी अँड. अनिल केसरकर, सुधीर राऊळ, उबाठा शिवसेनेचे शब्बीर मणियार, शैलैश गवंडळकर, भाजपचे माजी शहराध्यक्ष अँड. संजू शिरोडकर आदींसह नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला धारेवर धरलं होते. वाढते रूग्ण बघता तातडीनं डास मुक्तीसाठी प्रशासनना पुढाकार घ्यावा अशी मागणी त्यांनी केली होती. अखेर शुक्रवारपासूनच प्रभावीपणे ही मोहीम न.प. प्रशासनाकडून राबविण्यात आली आहे. याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, पावासाचे दिवस असल्यानं हे लिव्किड वाहून जाण्याची शक्यता आहे. त्याचा कितपत प्रभाव पडेल ही शंका आहे. त्यामुळे प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक धूर फवारणी देखील करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.