पावसाळा आला, नाटळ मुख्य रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार..?

Edited by:
Published on: June 07, 2024 13:06 PM
views 427  views

कणकवली : नाटळ येथे मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. गेले तीन महिने या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. मात्र, अजूनही या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही आणि जवळजवळ दोन महिने एसटी  आणि  वाहतुकीचा मार्ग बंद आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय झालेली आहे आणि याबरोबरच या कामाचा दर्जा सुद्धा खालावलेला आहे नाटळ जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम पंतप्रधान सडक निधीतुन चालू आहे.

तीन महिने या रस्त्याचे काम चालू आहे. दोन वेळा भूमिपूजन करून या रस्त्याचे श्रेय घेण्याचे काम राजकीय पक्षांनी केले. पण या रस्त्याच्या कामाचा दर्जा एकदम खराब आहे. चार ठिकाणी मोऱ्या बांधण्यात आल्या त्यापैकी दोनच काम झालं. दोन मोऱ्या अजूनही पाऊस सुरू होण्याअगोदर सुद्धा पूर्ण झालेले नाहीत. त्या मोऱ्याचे काम दर्जाहीन आहे एका मोरीला तर पूर्णपणे काँक्रीटला तडा गेलेला आहे.

या मोऱ्या टिकणार कशा..? आणि काम चांगलं होणार कसं यावर कोणाचंही लक्ष नाही. बेजबाबदारपणे काम चालू  असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केलेला आहे. गेले दोन महिने दळणवळणासाठी रिक्षा हाच एक मार्ग आहे. पण आता पाऊस सुरू झाल्यामुळे या ठिकाणी रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. त्यामुळे पूर्णपणे वाहतूक थांबली आहे आणि आता हा रस्ता पूर्ण होणार की नाही याची साशंकता निर्माण झाली आहे.

एकतर उशिरा काम त्यात  एसटी बंद प्रवास वाहतूक बंद आणि आता शाळा सुरू होणार असल्यामुळे शाळेतील मुलांच्या जाण्या येण्याचा मार्ग बंद झालेला आहे. हे कधी पूर्ण होतंय आणि प्रशासन नेमकं काय करतंय असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून गेला जातोय.