
मान्सून केरळमध्ये आगमन (Onset Over Kerala)*
♦️आज दिनांक 30 मे 2024 रोजी नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे त्याचबरोबर संपूर्ण नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा, मेघालय आणि आसामच्या बहुतांश भागांसह ईशान्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने अधिकृतरित्या जाहीर केलं आहे.
♦️01 जून या सामान्य तारखेच्या तुलनेत तब्बल 2 दिवस लवकर तर हवामान विभागाने 15 मे रोजी मान्सून आगमनासबंधी जाहीर केलेल्या 31 मे 2024 या तारखेच्या 1 दिवस आधी मान्सूनचे केरळात आगमन झाल्याचे हवामान विभागाने अधिकृतरित्या जाहीर केले आहे.
♦️मान्सूनच्या अरबी समुद्रातील शाखेची उत्तर सीमा (NLM) आता 13.0° उत्तर अक्षांश/ 70.0° पूर्व रेखांशा दरम्यान अमिनी (लक्षद्विप) तर 12.0° उत्तर अक्षांश / 77° पूर्व रेखांश, 11.0° उत्तर अक्षांश /78° पूर्व रेखांश दरम्यान कन्नूर, कोईमतूर व कन्याकुमारी या शहरांना व्यापते तर नैऋत्य मान्सूनची बंगालच्या उपसागराती शाखेची उत्तर सीमा 27.0°उत्तर अक्षांश/89.0°पूर्व रेखांशा दरम्यान अगरतळा व धुब्री या शहरांच्या जवळून जाते.
♦️नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, उर्वरित भागांमध्ये, केरळ, तामिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटकचा काही भाग आणि नैऋत्य, मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि पूर्वोत्तर राज्यांतील काही भागात मान्सून पुढील 2 ते 3 दिवसांत पुढे सरकाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.