मोहिनी मडगावकर यांची तेवढी पात्रता नाही : ऋतिका दळवी

Edited by: विनायक गांवस
Published on: April 08, 2024 13:43 PM
views 142  views

सावंतवाडी : मोहिनी मडगावकर यांची विनायक राऊत यांच्यावर  बोलण्याची पात्रता नाही. त्या वयाने खूप लहान ,तरुण आहेत तसेच त्यांचे भविष्य उज्वल आहे. वरिष्ठ नेत्यांना खुश करताना त्यांनी उगाच आपला बालिशपणा दाखवू नये असा टोला ठाकरे शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख ऋतिका दळवी यांनी लगावला.

दरम्यान, विनायक राऊत हे सुसंस्कृत आहेत. गेली दहा वर्षे ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना ते सर्वांचे चांगले परिचयाचे आहेत. त्यामुळे बोलताना मोहिनी मडगावकर यांनी आपली पात्रता  ओळखुन बोलावे असे त्या म्हणाल्या.