मोहन होडावडेकर यांची जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग अध्यक्षपदी निवड...!

Edited by: विनायक गावस
Published on: February 21, 2024 11:55 AM
views 90  views

सावंतवाडी : भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता मंञालयाच्या अंतर्गत गेल्या वीस वर्षांपासून शाश्वत विकासाचा ध्यास घेऊन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे संस्थापक असलेल्या जिल्ह्यातील जन शिक्षण संस्थान  या संस्थेच्या अध्यक्षपदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, काॅनबॅकचे संचालक, कुडाळ एम्. आय्. डि. सी. चे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांची निवड झाली. श्री होडावडेकर हे गेली पंचवीस वर्षाहून जास्त काळ जिल्ह्यात बांबू चळवळीत प्रभावीपणे काम करत असून काॅनबॅकच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.

कुडाळ एम्. आय. डी. सी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने उद्योजकांच्या अनेक समस्या मार्गी लावण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत.  काही काळ सुरेश प्रभू यांचे स्वीय सचिव म्हणून काम केल्याने प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असल्याने जन शिक्षण संस्थानची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारा भिमुख उपक्रम प्रभावीपणे राबवतील असा विश्वास असल्याने सुरेश प्रभू व मानव संसाधन विकास संस्थानच्या अध्यक्षा सौ. उमा प्रभू यांनी त्यांची निवड केलेली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सुरेश प्रभू, उमा प्रभू, माजी अध्यक्ष डॉ. शरद सावंत, माजी विश्वस्त अॅड नकुलव पार्सेकर, शिवप्रसाद देसाई, अलका नारकर, विजय केनवडेकर, माजी उपाध्यक्ष श्रीराम पेडणेकर यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.