कणकवली मतदार संघातील चाकरमान्यांसाठी 'मोदी एक्सप्रेस'

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 01, 2023 11:45 AM
views 795  views

कणकवली : दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली मतदार संघातील चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी ही एक्सप्रेस विशेष असणार असून नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर या वाढदिवसा दिवशी एक्सप्रेस दादर रेल्वे स्टेशन वरून प्लॅटफॉर्म नंबर ८ वरून दुपारी 12.30 वाजता ही मोदी एक्सप्रेस रवाना होणार आहे.

त्याचे बुकिंग 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत करता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या एक्सप्रेस द्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाण्याची व चहापाण्याची मोफत व्यवस्था केली जाणार आहे. या रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना बुकिंग साठी कणकवली विधानसभा मतदारसंघातील तालुकाध्यक्षांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.