
दोडामार्ग : केर गावात गेले चार दिवसापासून नेटवर्क गायब आहे. याठिकाणी रानटी हत्ती असून त्यांचा अंदाज घेण्यासाठी नेटवर्कच उपलब्ध नसल्याने शेतकरी काजू बागायतीत जात नाहीत. ग्रामीण भागात पर्यायी नेटवर्क नसल्याने बीएसएनएलवर अवलंबून राहावे लागत आहे. येत्या २४ तासात रेंज सुरळीत न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा माजी सरपंच सगुण नाईक यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले की आपले शासन ऑनलाईनच्या गप्पा मारत आहेत. त्यांनी ग्रामीण भागात येऊन वस्तुस्थिती पहावी. बोलायला नेटवर्क नाही आणि रेशनकार्ड धान्य सुद्धा ऑनलाईन दिले जात आहे. गावात येऊन रेशनकार्ड लाभार्थी यांना विचारा किती वेळ वाया जातो? उगाचच शहरांत बसून अधिकाऱ्यांनी ऑनलाईनच्या घोषणा करू नयेत. सध्या पाऊस नाही ना वारा तरीही ४ दिवस नेटवर्क नसणे हे प्रशासनाला लाजीरवाणे आहे.