
देवगड : दाभोळे गावातील दुर्दशा झालेल्या स्मशान भूमी बाबतीत ग्रामस्थ यांनी केलेल्या तक्रारी धरुन देवगड तालुका मनसेने 3/5/25 रोजी बेमुदत उपोषण करणार असल्याचे दाभोळे ग्रामपंचायत व प्रशासनाला पत्र दिले होते. प्रशासन व ग्रामपंचायत यांनी त्याची दखल घेऊन स्मशानभूमीबाबत प्रस्ताव मासिक सभेत घेऊन पंचायत समितीकडे पाठवला. तसेच शेड वरील तुटलेले काढून टाकण्यात आले आहेत. दाभोळे ग्रामपंचायत समोर घेण्यात येणारे बेमुदत उपोषण सध्या तरी मागे घेण्यात येत आहे. पण याबाबत पाठपुरावा कायम राहील व लवकरच या बाबत ग्रामपंचायत यांच्याशी ग्रामस्थ यांना घेऊन चर्चा करण्यात येईल.
दखल घेतल्या बद्दल सरपंच अणुभवने, ग्रामसेवक शेडगे, तसेच दाभोळे ग्रामपंचायत यांचे आभार मनसे तालुका प्रमुख संतोष मयेकर यांनी आभार मानले असून उपोषण तूर्तास स्थगित केले आहे.