विज्ञान प्रदर्शनाला मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली भेट

Edited by: विनायक गावस
Published on: December 05, 2023 12:17 PM
views 103  views

सावंतवाडी : कलंबिस्त इंग्लिश स्कुलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन या सुत्य उपक्रमाला मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, मळगाव उपशाखाअध्यक्ष शतायु जाभळे यांनी भेट देत शिक्षकांना विद्यार्थ्याना पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा. सावंतवाडी तालुक्यातील तालुकामर्यादित ५१ वे शालेय विज्ञान प्रदर्शन जिल्हापरीषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती सावंतवाडी यांच्या माध्यमातुन हे विज्ञान प्रदर्शन कलंबिस्त शाळेत भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात तालुकास्तरीय शिक्षक आणि विद्यार्थानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. वेगवेळ्या विज्ञान प्रयोगाने मुलांनी आणि शिक्षकानी सर्वाची मने जिंकली. या प्रदर्शनास संबोधित करताना सुधीर राऊळ यांनी सर्वाचे भरभरून कौतुक केले.