मनसे कसाल विभाग प्रमुख ठाकरे शिवसेनेत

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 26, 2024 13:40 PM
views 128  views

कणकवली : मनसेचे कसाल विभागप्रमुख प्रमोद परब यांनी गुरुवारी कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी आ. वैभव नाईक यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर, अवधूत मालणकर,पडवे माजी सरपंच प्रभाकर गोसावी,छोटू पारकर आदी उपस्थित होते. कसाल मध्ये प्रमोद परब यांना मानणारा मोठा वर्ग त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजप महायुतीला धक्का बसला आहे.