
सावंतवाडी : नगरपालिका प्रशासनाने इंदिरा गांधी कॉम्प्लेक्स येथील दुकानदारांवर दुकान लावण्याच्या पद्धतीवर आळा घालण्यासाठी काही दुकानांवरती धाड घातली. तसेच दीड फुटाच्या बाहेर लावलेल्या प्रत्येक स्टॅन्ड जप्त केले. काही दुकाने कारवाई न करता सोडल्याने .मनसेचे शहर सचिव कौस्तुभ नाईक यांनी प्रत्येक दुकानाला समभावाने कारवाई करण्यास सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाला भाग पाडले. कारवाई करत असाल तर सर्वांना सारखेच करा काही मोजकी दुकाने सोडत इतर सर्वांवर कारवाई का असा प्रश्न श्री नाईक यांनी उपस्थित केला. त्यानंतर 'त्या' दुकानांवर कारवाई करण्यात आली.