अवैध दारू वाहतूकीविरुद्ध मनसे आक्रमक

एक्साईजच्या अधिकार्‍यांना घेराव
Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 18, 2023 15:29 PM
views 42  views

सावंतवाडी : राजरोसपणे बेकायदा दारु वाहतूक करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी येथील मनसेच्या पदाधिकार्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली. संबंधित प्रकाराकडे डोळेझाक होत असल्यामुळे युवा पिढी बरदार होत आहे. त्यामुळे ही वाहतुक तात्काळ रोखा अशी मागणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांकडे करण्यात आली. 

दरम्यान याबाबत वारंवार आंदोलन करून सुध्दा कारवाईत सातत्य ठेवले जात नाही. त्यामुळे आता उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांविरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी देण्यात आला. मनसेच्या माध्यमातून आज इन्सुली राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांना घेराव घालण्यात आला.यावेळी मनसे विद्यार्थीसेना जिल्हध्यक्ष आशिष सुभेदार, माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक, माजी विभाग अध्यक्ष नाना सावंत, बांदा माजी शहराध्यक्ष बाळा बहिरे, विजय जांभळे, सुरेंद्र कोठावळे, आदेश सावंत निलेश देसाई, स्वप्निल जाधव, रघुनाथ खोटलेकर, गिरगोल दिया, ज्ञानेश्वर नाईक, रुपेश गुळेकर, सुनील नाईक, पंकज देसाई आदी उपस्थित होते.