'गुुहागर'मधून मनसेच्या प्रमोद गांधींना उमेदवारी जाहीर

Edited by: मनोज पवार
Published on: October 22, 2024 13:08 PM
views 77  views

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढवणार असून, गुहागर विधानसभा मतदार संघातून,  प्रमोद गांधी यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. प्रमोद गांधी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, कार्यकर्त्यांनी त्यांच्या शृंगारतळी येथील कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद साजरा केला आहे.

विकासाचे मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहोत. गुहागर विधानसभा मतदारसंघात नवनिर्माण हे आमचे प्रमुख ध्येय आहे. मतदार संघाचा विकास,  तरुणांना रोजगार, आणि उत्तम आरोग्य सेवा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध राहिल, अशी प्रतिक्रिया मनसे गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी दिली. 

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, मनसे उमेदवार प्रमोद गांधी यांचे नाव त्यांनी स्वखर्चाने केलेली विकासकामे, आणि गोरगरीब आणि गरजूंना केलेल्या मदतीमुळे, गुहागर तालुक्यात घराघरात पोहोचले आहे. लोकाना मतदारसंघात बदल हवा आहे. आजपासूनच आम्ही घराघरात मनसेचा प्रचार करणार आहोत. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, उपतालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, सुनील मुकनाक, निलेश गमरे, सुजित गांधी, प्रसाद कुष्टे, विवेक जानवळकर आदी उपस्थित होते.