आमदार नितेश राणे यांनी कळसुली विभागातही पक्ष प्रवेशाचे फोडले फटाके ! कळसुली माजी सरपंच अतुल दळवी यांचा भाजपात प्रवेश |

दळवी यांच्या भाजपा प्रवेशामुळे कळसुली विभागात भाजपची असलेली ताकद आणखीनच वाढली
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 25, 2022 11:18 AM
views 162  views

कणकवली : भारतीय जनता पार्टीत आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा धूमधडाका लावलेला असताना आज कळसुली माजी सरपंच अतुल दळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. अतुल दळवी यांचा पक्ष प्रवेश हा कळसुली विभागात राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण मानला जात आहे.

कळसुली माजी सरपंच अतुल दळवी यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी त्यांचे  ओम गणेश निवासस्थानी पक्षात स्वागत केले. अतुल दळवी यांच्या समवेत माजी तंटामुक्ती अध्यक्ष नारायण दळवी, दिगंबर सुतार, पांडुरंग गुरव, शांताराम नाईक, मंगेश दळवी यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी असलदे सरपंच पंढरी वायगणकर, नांदगाव येथील भाजपा पदाधिकारी भाई मोरोजकर आदी उपस्थित होते. 

कळसुली माजी सरपंच अतुल दळवी यांच्या भाजपा प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची कळसुली विभागात असलेली ताकद आणखीनच वाढली आहे.आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष प्रवेश  महत्वाचा मानला जात आहे.