
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील जलजीवन अंतर्गत कामांची स्थिती योग्य नाही. झालेल्या कामाची बिले ठेकेदारांना मिळालेली नाहीत. तर कित्येक कामांची बिले मिळाली पण कामे योग्य नाहीत. तर बरीच कामे अपूर्ण आहेत. यासाठी तालुकानिहाय बैठका घेऊन कामे त्वरीत पूर्ण करावी या बरोबरच जि. प. शाळांच्या दुरुस्ती तत्काळ कराव्या आदींसह विविध विकास कामांबाबत आमदार निलेश राणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांची गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालय येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासोबत सकारात्मक बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख संजू परब,दादा साईल, काका कुडाळकर, बाबा परब आदी उपस्थित होते.
या बैठकीत कुडाळ-मालवण तालुक्यातील प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झाले मात्र ही कामे नीटनेटकी झाली नाही की ते कामे पूर्ण झाली मात्र त्यांचे बिल ठेकेदारांना मिळाले नाहीत तर दिले मिळालेत पण झालेली कामे योग्य नाही आधी विषय आमदार निलेश राणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर ठेवले आणि जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामांचा आढावा घेण्यासाठी तालुकानिहाय बैठक घेवी आणि कामे त्वरित पूर्ण करा अशा सूचना दिल्या.
गणपतीपूर्वी खड्डेमुक्त रस्ते –
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचा असा सण गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे मात्र जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय झाले आहेत हे रस्ते गणपतीपूर्वी खड्डे मुक्त करावे यासाठी सुमारे चार कोटी रुपये एवढा खर्च असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेडकर यांनी आमदार निलेश राणे यांच्यासमोर सांगितले यावेळी जिल्ह्यातील पालकमंत्र्यांसह आम्हा दोन्ही आमदारांकडून प्रत्येकी एक एक कोटी रुपये घेऊन हे सर्व रस्ते गणपतीपूर्वी खड्डे मुक्त करावेत असे सांगत आपल्या आमदार निधीतून ₹१ कोटीची रक्कम जिल्हा परिषदेला प्रदान केले. यामुळे जिल्ह्यातील रस्ते खड्डे मुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ३ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही हा पगार त्यांना गणपतीपुळे मिळावा यासाठी प्रयत्न करा असे आमदार राणी यांनी सुचविले यावर प्रलंबित पगार देण्यासाठीची प्रक्रिया सुरू असून ४ दिवसांत अदा करण्यात येतील अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.
जिल्ह्यातील बऱ्याच शाळा नांदुरुस्त असून यामुळे विद्यार्थी कुणाच्यातरी अंगणात किंवा झाडाखाली शिक्षण घेत आहेत हे योग्य नाही त्यामुळे शाळा दुरुस्ती आणि नवीन वर्गखोली बांधकाम जलदगतीने करण्यावर भर द्यावा अशी सूचना आमदार राणे यांनी दिली. या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन हे सर्व विषय लवकरात लवकर मार्गी लावले जातील अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब हे उपस्थित होते.