आमदार निलेश राणे देवदूत

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 03, 2024 11:15 AM
views 424  views

मालवण : आमदार निलेश राणे हे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी देवदूत ठरले आहेत. राणे कुटुंबाचे दातृत्व आम्ही ऐकून होतो मात्र आम्हाला ते स्वतः अनुभवता आले. अशा भावना जिल्ह्यातील अनेक नेत्र रुग्णांनी व्यक्त केल्या आहेत. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय ओरोस येथे चार दिवसांपूर्वी सुमारे 70 नेत्र रुग्ण यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी बोलावण्यात आले. रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक होते. शस्त्रक्रिये पूर्वी दोन दिवस आधी तपासण्या वगरे असल्याने रुग्ण व नातेवाईक यांची मोठी गर्दी होती.  मात्र नातेवाईकांना त्या ठिकाणी कोणतीच व्यवस्था नव्हती. पुठ्ठा्यांचा आधार घेऊन नातेवाईकांनी रात्री झोपावे लागले. तर शस्त्रक्रिये दरम्यान मशीनच बंद पडली. शस्त्रक्रिया थांबल्या. टेक्निशियन कधी येईल मशीन केव्हा दुरुस्त होईल याची कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती. 

दृष्टीची समस्या असल्याने जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या रुग्णांचे हाल झाले. तसेच गेले दोन दिवस विविध समस्यांचा सामना करणारे नातेवाईक अधिकच त्रस्त बनले. 

मालवण येथील एका निराधार वृद्ध महिला नेत्र रुग्णा सोबत मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मातृत्व आधार संस्थेचे संस्थापक संतोष लुडबे त्या ठिकाणी आले होते. नेत्र रुग्णांची समस्या संतोष लुडबे तसेच अन्य काहींच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या कानी नेत्र रुग्णांची समस्या पोहचली. निलेश राणे यांनी सर्व माहिती जाणून घेतली. रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया झाली पाहिजे यासाठी आमदार निलेश राणे यांची तत्परता तात्काळ दिसली. 

पडवे एसएसपीएम हॉस्पिटल येथे करण्यात आली सुविधा 

आमदार निलेश राणे यांनी सर्व नेत्र रुग्णांवर पडवे एसएसपीएम हॉस्पिटल येथे उपचार करण्याचा निर्णय घेतला. पडवे हॉस्पिटल रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक यांनी त्या ठिकाणी दाखल होत सर्व रुग्णांना पडवे हॉस्पिटल येथे दाखल केले. रुग्णांच्या नातेवाईक यांचीही राहण्याची, जेवण्याची व्यवस्था करण्यात आली. 

पडवे एसएसपीएम हॉस्पिटल येथे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सुमारे 70 रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच उपचारा नंतर सर्व रुग्णांना घरी सोडण्याची व्यवस्थाही करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेबद्दल जी आपुलकीची भावना राणे साहेबांनी 1990 पासून जपली तीच भावना आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून अनेकांकडून जाणून होतो. आज ती अनुभवता आली. खऱ्या अर्थाने निलेश राणे हे निस्वार्थी लोकनेतृत्व आहेत. अशी भावना संतोष लुडबे यांनी व्यक्त केली.

आमदार निलेश राणे देवदूत

जिल्हा रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया मशीन बंद झाल्या नंतर शस्त्रक्रिये साठी दाखल झालेल्या अत्यावश्यक रुग्णांची समस्या बाबत माहिती मिळताच आमदार निलेश राणे यांनी ज्या तत्परतेने सेवा सुविधा उपलब्ध केल्या त्या देवदूत स्वरूपात होत्या. सर्व व्यवस्था उपचार अगदी मोफत करून रुग्णांना घरी नेण्याची व्यवस्था ही करण्यात आली. अन्यथा जिल्हा रुग्णालयात कधी शस्त्रक्रिया होणार होत्या हे काहीच कळत नव्हते. यापूर्वी अनेकवेळा अनेक रुग्ण शस्त्रक्रिये साठी आल्या नंतर काही तांत्रिक कारणांनी मागे परतले होते. आताही गंभीर स्थिती निर्माण झाली. मात्र संतोष लुडबे यांच्या माध्यमातून आमदार निलेश राणे आमच्यासाठी देवदूत ठरले. अशी भावना कुडाळ साळगाव येथील नेत्ररुग्ण बाळकृष्ण परब यांसह अनेक रुग्णांनी व्यक्त केली.