
वेंगुर्ला : माजी खासदार तथा विद्यमान आमदार निलेश राणे यांनी रेडी जिल्हा परिषद सदस्य तथा जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ व राऊळ कुटुंबियांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब, प्रितेश राऊळ, रेडी ग्रामपंचायत सरपंच रामसिंग राणे, आनंद शिरवलकर, सागर राणे यांच्यासहित राऊळ कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी प्रितेश राऊळ व रामसिंग राणे यांच्या हस्ते आमदार निलेश राणे यांचा शाल श्रीफळ व गणेश प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सलग दुसऱ्यांदा शिक्षण व आरोग्य सभापती पद भूषविणाऱ्या रेडी गावचे सुपुत्र प्रितेश राऊळ यांच्या कार्यपद्धतीचे निलेश राणे यांनी कौतुक केले.










