मंत्रालयात कृषीमंत्र्यांची आ. निलेश राणेंनी घेतली भेट

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 28, 2025 16:14 PM
views 143  views

मालवण : जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लागण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी मंत्रालय स्तरावर कामांचा धडाका लावला आहे. संबंधित विषयाच्या मंत्र्यांना भेटून पाठपुरावा सुरु ठेवला आहे. आज मंत्रालयात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेतली.

या भेटीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळ रोपवाटीका केंद्रातील रिक्त पदभरती, अनेक वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना ग्रेड-१ मजूर म्हणून शासकीय सेवेत सामावून घेणे, तसेच कृषी कार्यालयातील रिक्त शिपाई पदांवर अनुभवी कंत्राटी मजुरांना संधी देणे, यावर चर्चा करताना पात्र व गरजू मजुरांच्या उदरनिर्वाहासाठी योग्य निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली.