
दोडामार्ग: शनिवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या कोकण शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व त्यांचे बंधु वामन म्हात्रे यांचे मोपा विमानतळावर भाजपन जोरदार स्वागत केलं.
कसई दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण,पंचायत समिती मा.उपसभापती बाळा नाईक, गणेशजी राणे, प्रविण गवस, रंगनाथ गवस व सुनिल गवस आदींनी उपस्थित राहत आमदार म्हात्रे यांचं स्वागत केलं. म्हात्रे या स्वागतान भारावून गेले.