गावठी भाजीसाठी आमदार बाजारात...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 17, 2023 18:59 PM
views 8156  views

कणकवली : सणासुदीच्या निमित्ताने गणेश भक्त आता खरेदीसाठी कणकवली बाजारात खरेदीसाठी दाखल होत आहेत. याच वेळी आमदार वैभव नाईक स्वतः रविवारी सायंकाळी कणकवली नरडवे नाका येथील भाजी विक्रेत्यांकडून गावठी चीबुड आणि काकडी खरेदी केली. त्यावेळी  नाईक यांच्या  चाहत्यांना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. कोणताही लवाजमा न करता सर्वसामान्य माणसांसारखे हे आमदार आमच्यात मिसळतात हेच आम्हाला समाधान असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले.