जायंट किलर महेश सावंतांची शिवसेना शाखेला भेट

Edited by: विनायक गांवस
Published on: December 07, 2024 20:00 PM
views 303  views

सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जायंट किलर आमदार महेश सावंत यांनी शिवसेना शाखेला भेट दिली. यावेळी शिवसैनिकांनी आमदार श्री. सावंत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

माहिमचे आमदार महेश सावंत यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून सत्कार करण्यात आला. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार राजन तेली, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, शैलैश गवंडळकर, शिवदत्त घोगळे, मेघश्याम काजरेकर, बाळू माळकर, राजू शेटकर, श्रृतीका दळवी, आशिष सुभेदार, राजा वाडकर, श्री. गवस, निशांत तोरसकर, सोनू दळवी आदी शिवसैनिक उपस्थित होते.