
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मातोंड गावचे सुपुत्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माहीमचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत आज सावंतवाडी शिवसेना शाखेला भेट देणार आहेत.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई माहीमचे आमदार महेश सावंत हे वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गावचे सुपुत्र आहेत. ते आज सावंतवाडी शाखा येथे सायंकाळी ५ वाजता येणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना केलं आहे.