आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Edited by: विनायक गावस
Published on: October 14, 2023 15:54 PM
views 197  views

सावंतवाडी : शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्हि पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल आयोजित कार्यसम्राट आमदार डॉ राहूल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर श्री दत्त मंदिर माडखोल धवडकी येथे आयोजित करण्यात आले. या शिबिरात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तसेच, उपस्थित ग्रामस्थांचे मधुमेह, रक्तदाब,बॉडी मास इंडेक्स यांची चाचणी करून त्याबद्दल जागृकता करून मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात डि. फार्म, बी. फार्म, व एम.फार्म या अभ्यासक्रमातील विद्यार्थी आणि प्राध्यापिका मनाली वैद्य, दीप्ती फडते, वर्षा राणे, मेघा जाधव उपस्थित होते‌