
सावंतवाडी : नागपूरमध्ये सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी या नात्याने अधिवेशनाला उपस्थित राहत मतदारसंघाचे प्रलंबित प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. श्री. केसरकर प्रामुख्याने कोणते प्रश्न मांडणार याकडे मतदारसंघाचं लक्ष लागून राहिले आहे.










