शिरोडा येथील विवाहिता बेपत्ता | महिला दिसून आल्यास शिरोडा पोलिसांशी साधावा संपर्क

Edited by:
Published on: September 07, 2023 17:39 PM
views 2171  views

वेंगुर्ले : शिरोडा खालची केरवाडी येथील रहिवासी रूक्षा राजन सारंग (३८) (ता- वेंगुर्ला, जि-सिंधुदुर्ग) ही महिला दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता आपण माहेरी गांगवली गांवी (ता-गोकर्ण, जि-कारवार, राज्य-कर्नाटक) येथे जाते असे तिचा नवरा राजन राधोबा सारंग यांना सांगून निघून गेली आहे, पण ती अद्याप पर्यंत माहेरी गेलेली नाही तसेच शिरोडा येथील घरीही परत आलेली नाही. याची चौकशी नवऱ्याने तिच्या माहेरी तसेच नातेवाईक यांच्याकडे केली. मात्र तिचा माहिती कुठेही मिळाली नसल्याने राजन सारंग याने शिरोडा पोलीस स्थानकांत याबाबत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार शिरोडा पोलीस स्थानकातं रक्षा सारंग नापत्ता म्हणून नोंद करण्यात आली आहे.

सदर महिला ही कुठेही दिसून आल्यास शिरोडा पोलिस ठाणे पोलीस योगेश राऊळ-९४२१२३७६०१ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गजेंद्र भिसे, पोलीस योगेश राऊळ, व अजित जाधव करीत आहेत.