हत्तीप्रश्र्नी विनायक राऊतांकडून दिशाभूल : दीपक केसरकर

Edited by:
Published on: April 30, 2024 13:28 PM
views 119  views

दोडामार्ग : विनायक राउत 10 वर्ष खासदार होते, त्यांना आता टीका करण्याचा अधिकार नाही. हत्ती प्रश्नी तर ते सपशेल दिशाभूल करतात. इतकंच नव्हे तर आम्ही केलेल्या कामांच श्रेय ते घेत आहेत. केवळ सहानुभूती आणि राजकारण करून स्वतःची भोळी भाजून घेण्याच काम विनायक राऊत करत असल्याच रोखठोक प्रत्युत्तर मंत्री दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांना दिल आहे. येणार केंद्रातील सरकार आणि राज्यात असलेलं आमचं सरकार त्यामुळे येत्या काळात विकास कोण करू शकत हे ही जनतेला माहित आहे, त्यामुळे कोणी कितीही  भुलथापा मारल्या तरी जनता विकासाच्या बाजूनं आहे. आणि हा विकास आम्ही केलाय. 

 दोडामार्ग तालुक्यातील सुसज्ज ग्रामीण रुग्णालय इमारत, पंचायत समितीची इमारत, तालुका क्रीडा संकुल, नाट्यगृह, हेवाळे घोडगेवाडी व भेडशी येथील महत्त्वाची मोठी पुल, मोर्ले - पारगड रस्ता, मांगेली सडा रस्ता, चांदा ते बांदा मधून तिलारीची  डेव्हलपमेंट अशी महत्त्वाची विकास कामे आम्ही मंत्री असताना मार्गी लावली आहेत. या तालुक्यातील नियमित विजेसाठी महालक्ष्मी कंपनीशी रखडलेल्या कराराबाबत इलेक्शन व आचारसंहिता संपताच निर्णय घेतला जाईल, कजुला हमीभाव मिळावा याबाबत आम्हीच ठोस मार्ग काढला आहे. आडाळी येथील एमआयडीसी, तीलारी येथील पर्यटन विकास याबाबत इलेक्शन नंतरच्या सहा महिन्यात दोडामार्ग वासियांना विकास दिसेल. आपण काही करायचं नाही आणि ज्यांनी केलं त्यांच्या विरोधात जाणीव पूर्वक ओरड मारायची ही विरोधकांची राजकीय चाल राहिली आहे. केंद्रात खासदार असलेल्या राऊत यांनी हत्तींबाबत केंद्र सरकार कडे आज पर्यंत काय पाठपुरावा केला. माणगाव येथील हत्ती पकड मोहिमेच्या वेळी आम्हीही तिथं सोबत होतो. तिथल्या मोहिमेने दोन हत्ती दगवल्याने केंद्र सरकार पुन्हा हत्ती पकड मोहीम राबविण्यात अनुकूल नाही हे वास्तव आहे. मात्र हत्तींपासून होणारे नुकसान टाळणे, भरपाई वाढवून देणे याबाबत आम्ही काम केलं आहे. आणि येणार सरकार केंद्रात आपलंच असल्याने राणेंच्या मंत्री पदाच्या ताकदीने यावर आम्ही मिळून तोडगा काढू असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केलाय. 

कोकणच्या अस्मितेची राणेंच्या पाठीशी रहा

बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेतली जात होती. त्यामुळे माझ्या तत्वांसाठी मुख्यमंत्री शिन्देन्सोबत जाणं गरजेचं होत. नारायण राणेंशी संघर्ष नक्कीच झाला. मात्र कोकणच्या विकासासाठी कायमच एकत्र आलोत. कोकणचा विकास घडत असताना नारायण राणेंची मोठी भूमिका असेल. कोकणी माणसं आपापसात वाद करत राहिल्याने इथला विकास तसाच राहतो. त्यामुळे कोकणी माणसाने हा लढा कोकणच्या अस्मितेचा केला पाहिजे, त्यासाठी नारायण राणेंच्या मागे ठामपणे उभ राहिले पाहिजे, असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी दोडामार्ग इथं केलं.  यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, शहरप्रमुख योगेश महाले, युवासेनेचे तालुकाप्रमुख भगवान गवस, दादा देसाई, रामदास मेस्त्री, सरपंच अनिल शेटकर, गोकुळदास बोंद्रे, राजन गवस आदी उपस्थित होते.