अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता

आईची पोलीसांत तक्रार
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 18, 2023 18:31 PM
views 488  views

वैभववाडी :  तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी मंगळवारी ता १७ ऑक्टो रात्री १च्या सुमारास घरातून निघून गेली आहे. याबाबतची तिच्या आईने पोलीसात तक्रार दिली आहे. 

तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी घरातून गायब झाली होती. मंगळवारी रात्री ही मुलगी जेवण झाल्यानंतर आपल्या दोन बहीणी सोबत घरातील हॉलमध्ये झोपी गेली. वडील हे त्यांच्या मुळ गावी गेले होते. मध्यरात्री १च्या दरम्यान तिची आई व भाऊ झोपेतून उठले असता मुलगी घरातून निघून गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत आज ता.१८ वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस या अल्पवयीन मुलीचा शोध घेत आहेत.