
कणकवली : आमदार नितेश राणे यांचं मंत्रिपद निश्चित झालं आहे. त्यामुळेच कणकवली शहरातील पटवर्धन चौकामध्ये कार्यकर्त्यांनी फटाके लावून आनंद व्यक्त केला. तसेच व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांच्याशी बोलून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बरेच दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता आणि हा विस्तार आता आज सायंकाळी होत आहे आणि त्यासाठी आमदार नितेश राणे यांना मंत्रीपदासाठी फोन आल्याने कणकवली मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हात प्रत्येक तालुक्यात चौकाचौकात फटाके लावून आनंद साजरा केला.