सिंधुदुर्गातील ठेकेदारांनी मानले मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार

सार्व. बां. च्या नवीन मंडळ कार्यालयासाठी व्यक्त केलं समाधान
Edited by: विनायक गांवस
Published on: February 07, 2024 05:17 AM
views 285  views

सावंतवाडी : जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ कार्यालय झाल्याबद्दल ठेकेदारांनी रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला त्यामुळे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सावंतवाडी येथे भेट घेऊन सिंधुदुर्गातील सर्वच ठेकेदारांनी आभार मानले.

सध्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रत्नागिरी येथे एकच सार्वजनिक बांधकाम मंडळ असून स्वतंत्र मंडळ स्थापन झाल्यामुळे भविष्यात प्रशासकीय दृष्ट्या गतीमान कामकाज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा होणार आहे.

या नवीन मंडळ कार्यालयासाठी १७ पदे उपलब्ध करून देण्यास मान्यता, यातील १० नियमित पदे व ७ बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार असल्याने आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम विभाग गतिमान होणार आहे. यासाठीच जिल्ह्यातील सर्व ठेकेदाराने मंत्री रवींद्र चव्हाण यांचे पाच सावंतवाडी येथे भेटून आभार मानले. यावेळी सुशील लोके, रामदास विखाळे, मुदस्सर शिरगावकर, रंजन चिके, आबा मुंज, आशिष परब,अमेय आरोंदेकर, रोहीत नाडकर्णी, बी.डी.पाटील, दिलीप नार्वेकर, दया परब, मिलींद केळुसकर, राहुल केळुसकर, हेमंत देसाई, समीर पेडणेकर, अखिल पालकर यांच्यासह अन्य ठेकेदार देखील उपस्थित होते.