
सावंतवाडी : कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आ.निरंजन डावखरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पदवीधर मतदारसंघासाठी रणनिती आखली आहे. भाजपच्या ताब्यात हा मतदारसंघ ठेवण्यासाठी ते मैदानात उतरले आहेत.
नुकताच रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत निरंजन डावखरे यांनी आपला पदवीधर उमेदवारी अर्ज दाखल केला. मनसेच्या अभिजीत पानसे हे इच्छुक असल्यानं सुरूवातीलाच या निवडणुकीस रंगत आली होती. यात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेन निवडणूकीतून माघार घेतली. यानंतर भाजपच्या विजयासाठी रविंद्र चव्हाण यांनी यंत्रणा कामाला लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा बैठकांवर भर दिला आहे. कोकण विभागातून नुकताच रविंद्र चव्हाण यांनी महायुतीला घवघवीत यश मिळवून दिलं. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, कल्याण, ठाणेत महायुतीचा बोलबाला होता. भाजप कार्यकर्त्यांनी याच श्रेय कोकणची जबाबदारी ज्यांच्यावर होती अशा रविंद्र चव्हाण यांना दिलं. यातच आता रविंद्र चव्हाण यांनी पदवीधर मतदारसंघासाठी रणनिती आखली आहे. भाजपच्या विजयासाठी ते मैदानात उतरले आहेत. जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठकांवर त्यांनी भर दिला आहे.