
वैभववाडी : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २३जून रोजी माजी नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. येथील भाजपा कार्यालयात सकाळी १० ते दु.१ या वेळेत हे शिबीर होणार आहे.
या शिबिरात रुग्णांची मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे. तसेच आवश्यकता असलेल्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी केले आहे.