
सिंधुदुर्ग : खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस सिंधुदुर्गनगरी पार पडतोय. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी जोरदार भाषण करत शुभेच्छा दिल्यात.
आता सत्ता आल्यावर समर्थकांची संख्या वाढू लागलीय. अनेकांचं प्रेम उफाळून येतंय. विरोधात असताना ठाम विश्वास होता पुन्हा एकदा सिंधुदुर्ग राणेमय होणार. निलेश राणे म्हणाले ते खरं आहे. नारायण राणेंना खासदारकी लढवायची नव्हती. पण हेही खरं आहे. नारायण राणे नसते तर भाजप - महायुती खासदारकीची सीट कधीच जिंकू शकली नसती, हेही सत्य आहे. साहेबच होते ज्यांना जनतेने स्वीकारलं. लोकांना माहिती होत, 10 वर्ष निवडून दिलेल्या खासदाराऐवजी नारायण राणेचं आपला आवाज संसदेत पोहचवू शकतात. सिंधुदुर्गच्या जनतेशी असलेलं नातं अधिकच घट्ट होतं चाललेल आहे. या सोप्या गोष्टी नव्हत्या. आव्हानं होती. नारायण राणेंनी कोकणसाठी जी स्वप्न पाहिलीत ती आता पुढच्या 5 वर्षात पूर्ण होतील. आता सगळेच गुच्छ देतात, मात्र 10 वर्षात जे कार्यकर्ते निस्वार्थपणे राणे कुटुंबियांच्या मागे आहेत, उद्या काय होणार याचा विचार केला नाही, आमचं फक्त राणे साहेबांवर प्रेम आहे. आमचा पक्ष म्हणजे राणे ही ओळख सांगणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगतो, आता तुमचे दिवस आले आहेत. तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. साहेबांना तुम्ही दिलेली साथ आमच्यासाठी महत्वाची होती.
साहेबांना जेवणावरून उठवून अटक करण्याचा तो क्षण आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे. ज्यादिवशी त्याची परतफेड करेन त्याच दिवशी डिलीट मारणार. तो क्षण जवळ आलेला आहे टप्प्याटप्प्याने. कोण कुठे जात नाही. सगळ्याचा हिशोब होणार. दीपकजींच्या आशीर्वादामुळे दोडामार्गचं जेलही दिसलं. मात्र, लोकसभेत केसरकरांनी जी काही साथ दिली त्यामुळे सगळं जुनं पुसून गेलं. त्यांचंही आमचं कधीच वैर नव्हतं. कोणा तिसऱ्याला फायदा करून द्यायचा होता म्हणून आमच्यात भांडण लावली. राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते कुठंही सुटत नाहीत. नारायण राणेंनी जे विचार दिलेत, ताकद दिली, त्या मार्गावर चालणार, असा विश्वास मंत्री नितेश राणेंनी आपल्या भाषणात दिला.