
सावंतवाडी : सावंतवाडी कारागृहामागील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शिवपुत्र शंभूराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी संभाजी महाराजांच्या स्मारकाला भेट देत अभिवादन केलं.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे नागरिकांच्या पुढाकारातून हा पुतळा उभारण्यात आला आहे. आज रात्री उशीरा नितेश राणे यांनी या ठिकाणी भेट देत छ. संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शंभूराजांसमोर नतमस्तक होत जय भवानी, जय शिवाजी, छ. संभाजी महाराज की जय, जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, विनायक रांगणेकर, दिनेश गावडे, कृष्णा धुळपनवर, श्रीकृष्ण सावंत, माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, गुरूनाथ मठकर, साईराज नार्वेकर, बंटी जामदार, शुभम घावरे, कुणाल शृंगारे, बंटी पुरोहित, लादू रायका, साईश परब यांसह बजरंग दल, विहींप, सकल हिंदू समाजबांधव उपस्थित होते. महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.