मंत्री नितेश राणेंनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन

Edited by: श्रीधर
Published on: June 07, 2025 16:18 PM
views 270  views

धाराशिव : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे धाराशिव दौऱ्यावर आहेत. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन जोरदार स्वागत केले.

तर ना. राणे यांनी तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तुळजाभवानीच्या दर्शनाने मनाला समाधान आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.