मंत्री नारायण राणे यांची विशाल परब यांनी घेतली भेट

Edited by: भरत केसरकर
Published on: April 04, 2024 15:19 PM
views 203  views

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भाजप युवा मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी भेट घेतली. यावेळी सोबत संजू परब व सावंतवाडी येथील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे हा सावंतवाडीत आले होते. यावेळी विशाल परब यांनी ही भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत सावंतवाडी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नारायण राणे यांच्या आज सावंतवाडी येथील अचानक भेटीने कार्यकर्त्यांमध्ये एकच प्रकारचा जोश आणि उत्साह पाहायला मिळाला. यावेळी नारायण राणे यांनी विशाल परब, संजू परब आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संवाद साधला.