आरोग्यमंत्र्यांच्या विधानावर मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया

Edited by: विनायक गावस
Published on: December 10, 2023 14:58 PM
views 213  views

सिंधुदुर्ग : आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी तळकोकणातील आरोग्य ठिकठाक असल्याचा दावा अतारांकित प्रश्नांवर केला होता. याबाबत शालेय शिक्षणमंत्री तथा सावंतवाडीचे तरआमदार दीपक केसरकर यांना विचारलं असता ते म्हणाले, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना  इथल्या परिस्थितीबाबतच पत्र दिलेल आहे. मेडिकल ऑफिसर सिंधुदुर्गमध्ये नाही आहेत.

विशेषतः सावंतवाडी मतदारसंघातील चारही रूग्णालयातील रिक्तपद भरण्यासाठी पत्र दिलं आहे. भरती प्रक्रियेत आम्हाला रिक्तपदांचा ठिकाणी डॉक्टर देण्यात यावेत अशी मागणी केली आहे. आरोग्यमंत्री यांनी ती मागणी मान्य केली आहे असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.