
सावंतवाडी : आंबोली गेळे कबुलायतदार गावकर जमिनीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीची आज सकाळी 11 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु, गेळे ग्रामस्थांच्यावतीने बैठकीस उपस्थित राहणार नाही असे पत्र गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, गेळे कबुलायतदार गावकर जमिनीच्या अनुषंगाने प्रशासनाने पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्यात यावी व या बैठकीस गेळे सरपंच यांच्यासह गावातील प्रमुख गावकर मंडळींना निमंत्रित करावे.तसेच ग्रामस्थांच्या अनुपस्थितीत कोणाताही निर्णय घेतल्यास त्याचा विरोध होईल. असे बोलताना ग्रामस्थानी जाहीर केले आहे.