मंत्री केसरकर यांचा ६८ वा वाढदिवस मोठया उत्साहाने साजरा होणार | वाढदिवस सप्ताह साजरा करुन विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन

Edited by: विनायक गावस
Published on: July 17, 2023 21:27 PM
views 92  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापुर जिल्हा व मुंबई शहरचे पालकमंत्री मा.ना. श्री. दीपक केसरकर साहेब यांचा ६८ वा वाढदिवस आज मोठया उत्साहाने साजरा होत आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने दीपकभाई मित्रमंडळाच्यावतीने विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने दीपकभाई मित्रमंडळाच्यावतीने जिवन आनंद संस्था संचालित सविताश्रम पणदूर येथे भेट देऊन २ हॉस्पिटल बेड, २ सलाईन स्टॅण्ड, १ फोल्डींग स्ट्रेचर, १ वॉटर क्युरीफायर भेट दिला जाणार आहे. तर जीवन संजिवन सेवा ट्रस्ट, आनंदाश्रय, अणाव येथे भेट देऊन २ वॉकर, व २ व्हीलचेअर भेट देण्यात येणार आहे.

शिवसेना सावंतवाडी मतदार संघ व दीपकभाई केसरकर मित्रमंडळ आयोजित लोकमान्य हॉस्पिटल पुणे यांच्या सौजन्याने मंगा आर्थोपेडीक कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. या कॅम्पमध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीच्या अस्थिरोग तज्ञांमार्फत मोफत तपासणी करण्यात येणार आहे. सदर कॅम्प मंगळवार १८ जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय शिरोडा, १९ जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले, २० जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालय दोडामार्ग, २१ जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी, २२ जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा, २३ जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

तसेच शिवसेना सावंतवाडी मतदार संघ व दीपकभाई केसरकर मित्रमंडळच्या वतीने अरिहंत हॉस्पिटल बेळगांव यांच्या सौजन्याने उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे सकाळी १० वाजता मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तसेच दिनांक २२ जुलै २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ. राजेश नवांगुळ, स्त्री रोग तज्ञ, यशराज हॉस्पिटल, सावंतवाडी यांच्या सहकार्याने यशराज हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे निदान व मार्गदर्शनसाठी विशेष मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सिंधुदुर्ग शिवसेना महिला आघाडीतर्फे माजगांव तालुका सावंतवाडी येथील दिव्यांग मुलामुलींना खाऊवाटप करण्यात येणार आहे. सावंतवाडी येथील मंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये दिनांक १८ रोजी सकाळी १०.०० वाजता केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

दिनांक १९ जुलै रोजी सावंतवाडी शहरातील अंकुर निवारा केंद्र येथील महिलांसाठी इलेक्ट्रीक गिझर भेट देण्यात येणार आहे. दिनांक २० जुलै रोजी सावंतवाडी शहरातील सर्व माध्यमिक विद्यालयामध्ये

किशोरवयीन विद्यार्थीनींना आरोग्य विषयक मार्गदर्शन, सॅनिटरी नॅपकीन, आरोग्य विषयी मार्गदर्शक पुस्तक वितरीत करण्यात येणार आहे. दिनांक २१ जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये शेतक-यांना मिरी रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. सावंतवाडी शहर शिवसेना महिला आघाडीच्यावतीने साहस प्रतिष्ठान दिव्यांग विकास केंद्रामध्ये अत्यावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात येणार आहे.

बुधवार दिनांक १९ जुलै रोजी काझीशहाबुद्दीन हॉल, सबनिसवाडा येथे सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत माजी नगरसेविका, महिला पदाधिकारी यांच्यासाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तसेच मराठी भाषा विकास या अंतर्गत शालेय मुलांसाठी हस्ताक्षर वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये हस्ताक्षर तज्ञ श्री. विकास गोवेकर मार्गदर्शन करणार आहेत तर शिक्षणतज्ञ श्री. भरत गावडे नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. हे कार्यक्रम सकाळी ११.०० ते १.०० या वेळेत माजगांव हायस्कुल व ३.०० ५.०० या वेळेत जि.प. शाळा माडखोल नं. १ येथे होणार आहेत.

तसेच सावंतवाडी शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री. मंगलदास देसाई यांच्यामार्फत स्थापेश्वर मंदिर जवळ डेगवे येथे नारळरोपांचे वाटप करण्यात येणार आहे.


गुरुवार दिनांक २० जुलै रोजी स्वामी समर्थ केंद्र क्रमांक २, गरड येथील मठामध्ये सायंकाळी ६ वाजता गोड प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

दोडामार्ग तालुक्यातील कार्यक्रम- दिनांक १८ जुलै २०२३ रोजी शिवसेना दोडामार्ग तालुक्याच्यावतीने तालुका कार्यालय येथे केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच करुणासदन शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.


दिनांक १९ जुलै २०२३ रोजी शिवसेना कार्यालय दोडामार्ग येथे विशेष प्राविण्य विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक २३ जुलै २०२३ रोजी दोडामार्ग तालुका मर्यादित वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे उद्घान मा. मंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहेत.


तालुक्यातील कार्यक्रम

दिनांक १८ जुलै रोजी सकाळी ८.०० वाजता वेंगुर्ले कॅम्प मैदान येथे राज्यस्तरीय पावसाळी हॉलिबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धांचे आयोजन वेंगुर्ले तहसिलदार श्री. ओतारी यांच्या हस्ते होणार आहे.सकाळी ९.०० वाजता गणेश मंदिर, पॉवर हाऊसजवळ वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन दीपकभाई मित्रमंडळाच्यावतीने करण्यात येणार आहे.