मंत्री केसरकरांनी घेतलं दोडामार्ग मधील सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतींचं दर्शन...!

Edited by: संदीप देसाई
Published on: September 28, 2023 11:01 AM
views 111  views

दोडामार्ग : येथील पिंपळेश्वर सार्वजनिक गणपतीचे महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दर्शन घेतले.यावेळी शहर वसियांच्या व मंडळाच्यावतीनं नगराध्यक्ष चेतन चव्हाण व मंडळाचे अध्यक्ष अजित चांदेलकर यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी गणेश उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत केरकर, खजिनदार उदय मयेकर, संतोष फाटक प्रकाश सावंत, सागर चांदेलकर, विशांत परमेकर, सुधीर चांदेलकर, आनंद कामत व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

तर मंत्री केसरकर यांसह शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, शहरप्रमुख योगेश महाले, भगवान गवस, रामदास मेस्त्री, चेतना गडेकर, प्रवीण गवस आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर मंत्री केसरकर यांनी साटेली, भेडशी आणि आयी येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांनी पूजन केलेल्या बाप्पांचेही दर्शन घेतलं. साटेली येथे मंडळाचे पदाधिकारी ऋषिकेश धरणे, संजय गवस यांनी तर भेडशी येथे नंदू टोपले, सिद्धेश पांगम आदींनी स्वागत केल.