मुख्यालयात 'सैनिक दरबार'

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 23, 2025 20:06 PM
views 10  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरपिता, वीरमाता व अवलंबिताना यांच्या कुंटुंबावरील अन्याय, अत्याचारांसंबंधित व इतर प्रलंबित अडीअडचणी जाणुन घेवुन त्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे,  उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, हेमंत निकम, सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर, कार्यालयातील कर्मचारीवृंद, तसेच जिल्ह्यातील वीरमाता-पिता वीरनारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, माजी सैनिक विविध संघटनेचे पदाधिकारी  उपस्थित होते.

 सैनिक दरबाराच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते पात्र माजी सैनिक पाल्यांना परदेश शिक्षण व व्यावसायिक शिक्षणासाठी कल्याणकारी निधीतुन धनादेशाचे वाटप करण्यात आले.

 यानंतर  माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरपत्नी, वीरमाता, पिता आणि त्यांच्या अवलंबितांच्या यांच्या कुंटुंबावरील अन्याय, अत्याचारांसंबंधित अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्यात आले.