
देवगड : देवशयनी आषाढी एकादशी मिलिंद सदानंद पवार प्राथमिक शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील शिक्षिका जामदार यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक प्र. भा. खडपकर पूर्व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या अभिनव कार्यक्रमाचे संस्था पदाधिकारी यांनी कौतुक केले. या निमित्त शाळेमध्ये दिंडीचा कार्यक्रम अगदी उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमां मध्ये इ. १ली ते इ. ४थी च्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मुला मुलींनी वारकरी वेशभूषातसेच पारंपारिक वेशभूषेत मध्ये विठू नामाच्या गजरात हा कार्यक्रम करण्यात आला. टाळ, लेझीम यांच्या सहाय्याने अभंग ओव्यांच्या जल्लोषात हा कार्यक्रम मनोरंजनात्मक व भक्तिभावाने सादर करण्यात आला.यानंतर इ. ३ री व इ. ४थी च्या विद्यार्थ्यांना यावेळी अनेक संतांची महती सांगण्यात आली.