जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत मिलाग्रीसचं घवघवीत यश

Edited by: विनायक गांवस
Published on: January 04, 2025 12:48 PM
views 249  views

सावंतवाडी : उपरकर शुटिंग ॲकॅडेमी, वेंगुर्ला आणि सिंधुदुर्ग जिल्हा शुटिंग असोसिएशन, सावंतवाडी यांच्यावतीने २८ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मिलाग्रीस हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले. पीपसाईटमध्ये, १६ वर्षाखालील गटात नरेंद्र शिवम चव्हाण याने प्रथम क्रमांक व  निलराज निलेश सावंत याने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

सोळा वर्षाखालील गटात एअर पिस्तूल या प्रकारात कु. आर्या भांगले, हिने द्वितीय क्रमांक पटकावला.या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या एकूण उत्कृष्ट कामगिरीमुळे, प्रशालेसाठी द्वितीय क्रमांकाचा चषक मिळाला आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे प्राचार्य फादर रिचर्ड सालडाना, पर्यवेक्षिका टीचर संध्या मुणगेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.