भाजपतर्फे ख्रिस्तीबांधवांना 'मेरी ख्रिसमस' !

Edited by: दिपेश परब
Published on: December 26, 2023 15:52 PM
views 65  views

वेंगुर्ला : ख्रिस्ती धर्मियांच्या नाताळ सणाचे औचित्य साधून भाजपाच्यावतीने वेंगुर्ले तालुक्यात ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि सर्वधर्मीयांचे उत्सव-सण मोठ्या उस्ताहाने साजरे करतात. ख्रिस्तीधर्मीयांचा नाताळ अर्थात ख्रिसमस हा यापैकी एक सण. नाताळ मुलत: प्रेमाचा संदेश देणारा सण आहे. या नाताळ सणानिमित्त भाजपा सदस्य मनवेल फर्नांडिस, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सायमन आल्मेडा,परबवाडा माजी सरपंच ईनासीन फर्नांडिस व उभादांडा माजी सरपंच ईलीहास फर्नांडिस यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपा प्रदेश सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या .
   

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई , माजी नगराध्यक्ष राजन गिरप, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल ,ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , आसोली उपसरपंच संकेत धुरी , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , मारुती दोडशानट्टी , सोशल मिडीयाचे अमेय धुरी , बुथप्रमुख रविंद्र शिरसाठ व बाळा मळगांवकर , सत्यवान परब , संतोष सावंत , चैतन्य दळवी , ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते .